जर....  

Posted by Nayan Shenai

चन्द्राविना तार्यांना काही तेजच उरत नसते,
त्यांच्या अंधुकश्या प्रकाशाला किंमतच नसते.
मातीच्या या देहाला समझा हृदयच जर नसते,
सांगा कुणी कधी कुणावर प्रेम केले असते.
मनाशी मन गुंतता जेव्हा रेशीम गाठ बनते,
आयुष्याच्या जोडीदाराशी नाते आपले जमते.

प्रेम  

Posted by Nayan Shenai

रोज उगवणाऱ्या सूर्या सारखं नवीन वाटतं प्रेम,
उन्हातल्या ढगांच्या सावली सारखं असतं प्रेम,
वाहत्या ओढ्याच्या स्वछ: पाण्याप्रमाणे असतं प्रेम,
फुलपाखराच्या पंखाच्या रंगाप्रमाणे असतं प्रेम,
रेशमाच्या धाग्यासारखं चमकदार असतं प्रेम,
सुम्भासारखं दणकट आणि मजबूत असतं प्रेम,
हरणासारखं चपळ आणि नाजूक असतं प्रेम,
वडासारखं जुनं पण विशाल असतं प्रेम,
अर्जुनाच्या कृष्णंभक्ती सारखं एकनिष्ट असतं प्रेम,
चंद्राच्या चांदण्यासारखं शीतल असतं प्रेम,
किती मी व्याख्या सांगू प्रेमाची....
जरा आरशात बघ...
तुझ्यासारखच असतं प्रेम.

तुझा शोध  

Posted by Nayan Shenai

तुझी प्रतिमा मी रंगवत असतो,
तुझ्याशी मी रोज बोलत असतो,
थट्टा मस्करी आणि भांडत असतो,
पण तरी वेळ माझा जात नसतो.
तुझ्यावर खूप दिवसांपासून लिहायचा म्हणतो,
पण तुझ्यासाठी शब्दच सापडत नाहीत.
तुझा विषय निघाला कि शब्द हरवतात.
कारण तेव्हा मी मीच नसतो,
सर्व क्षणात सर्व कणात
तुला शोधत भरकटत असतो.